गणरायाच्या साक्षीने घेतला विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय

चंद्रपुर : शहरातील ठिकठिकाणी  सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच मूल मार्गावरील शहरातील संजय नगरातील छत्रपती शिवाजी महाराज बाल गणेश मंडळाने एक मोलाचे सामाजिक दायित्वाचे कार्य पार पाडले आहे. संजयनगर परिसरातीलच एका प्रेमी युगलाने गणरायाच्या आरतीनंतर विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि गणरायाच्या साक्षीने पार पडले प्रेमीयुगलांचे शुभमंगल सावधान! गणेश  मंडपातच प्रेमी युगलांचे  लग्न लावून दिल्याने गणेश मंडळातील सदस्यांचे कौतुक होत आहे.  

गणेशोत्सव म्हणजे जल्लोष, भक्तीचा महासागर, आनंदाचा ओसंडून वाहणारा झरा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचे व त्यांच्यात देशभक्ती जागृत करण्याचे प्रभावी माध्यम. लोकमान्यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही संपुर्ण राज्यात कायम आहे. काळानुरूप उत्सवाच्या स्वरूपात तसेच उत्साहात काही बदल झाले आहेत मात्र अजूनही भक्तिभावना मात्र तशीच आहे हे नक्की. दहा दिवसांचा उत्सव झाल्यावर गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीला स्वगृही जातात. 

शहरातील संजय नगर परिसरात सहदेव मंडल व संगीता मंडल हे प्रेमीयुगल राहतात. काही महिन्यांपासून या दोघात प्रेमसंबंध होते. याची माहिती गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा होती. अशातच गणेश आरती सुरू असतानाच हे प्रेमी युगल तेथे आले. आणि आरती संपताच गणेश मंडळातील सदस्यांनी त्यांना लग्नाबाबत विचारणा केली असता प्रेमी युगलांनी सुद्धा होणार दिला. त्यानंतर युवक व युवतीच्या परिवारातील सदस्यांना मंडपात बोलावून घेतले. दोघांच्याही परिवारातील सदस्यांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. त्यांनी हंकार देताच  गणेश मंडपातच गणरायाच्या साक्षीने दोन्ही प्रेमी युगलांचे पार पडले शुभमंगल सावधान. 

दरम्यान या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे. यावेळी मंडळातील रिजवान पठाण, लोकेश हिरवणे, मिथुन पंढरे, लूमन साहू, अक्षय साहू, वैभव राऊत यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Bal Ganesha Mandal in Sanjay Nagar on Mool Marg has performed a valuable task of social responsibility.  A couple in Sanjay Nagar area decided to tie the knot after Ganaraya's aarti and it was done under the witness of Ganaraya.  The members of the Ganesh Mandal are being appreciated for marrying the lovers in the Ganesh Mandapam itself.

Ganeshotsav means jubilation, an ocean of devotion, an overflowing fountain of happiness and most importantly an effective means of uniting people in the freedom struggle and instilling patriotism in them.  The tradition of public Ganeshotsav started by Lokmanya continues even today in the entire state.  There have been some changes in the form and spirit of the festival over time, but the spirit of devotion remains the same.  After ten days of celebration, Ganapati Bappa goes home on Anant Chaturdashi.

Sahadev Mandal and Sangeeta Mandal live in Sanjay Nagar area of ​​the city.  The two were having an affair for a few months.  The office bearers of Ganesh Mandal were also aware of this.  Just as the Ganesh Aarti was going on, this loving couple came there.  And as soon as the aarti was over, when the members of the Ganesh circle asked them about the marriage, the loving couple also agreed.  After that, the family members of the youth and the girl were invited to the mandap.  The family members of both were informed about their love affair.  As soon as they agreed, in the presence of Ganaraya in the Ganesh Mandap, the auspiciousness of both lovers was performed.

Meanwhile, this different initiative is being appreciated in the city.  On this occasion, Rizwan Pathan, Lokesh Hirwane, Mithun Pandhare, Luman Sahu, Akshay Sahu, Vaibhav Raut and other citizens of the area were present.