लाठीमार प्रकरणाची उपविभागीय अधिका-यांमार्फतीने होणार चौकशी

चंद्रपूर : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्ते व गणेश भक्तांवर लाठीमार करणाऱ्या एका पोलीस शिपायाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.  शिवाय या प्रकरणाचे उपविभागीय पोलीस अधिका-यांमार्फतीने चौकशीचे आदेश दिले आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्ते व भक्तांवर   लाठीमार करण्याची घटना काल शुक्रवारी चंद्रपूर शहरातील गणरायाला निरोप घेताना निघालेल्या मिरवणूकीदरम्यान शहरातील मुख्य मार्गावर घडली होती.
     
प्राप्त माहितीनुसार,  दरवर्षीप्रमाणे चंद्रपूरात गणरायाचे थाटात आगमण झाले. विविध मंडळांनी विविध देखाव्यांसह गणरायायाची आठवडाभर मनोभावे पूजाअर्चा केली. काल शूक्रवारी चंद्रपूर शहरातील गणेश मंडळांनी स्थापीत केलेल्या   गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व जय्यत तयारी केली. पोलिस प्रशासनानेही विसर्जन मिरवणूक रॅलीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी याकरीता जय्यत तयारी केली. त्यानंतर काल सायंकाळ पासून पोलीस बंदोबेस्तात विसर्जन मिरवणूकीला सूरूवात झाली. गणेशाला निरोप देण्याकरीता निघालेली मिरवणूक रॅली शहरातील जयंत टॉकीज चौकात पोहचली. त्यावेळी  जटपुरा गेट परिसरातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची मिरवणूक तिथे पोहचली. मात्र समोरील मंडळाला डावलून मागे असलेल्या गणेश मंडळाला पोलिसांनी पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. ह्याबाबत चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी अरेरावी करून वाद घातला असा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला. ह्यामुळे वातावरण तंग झाले असता पोलिसांनी वरिष्ठांना कुठलीही माहिती न देता तसेच आदेश नसताना थेट  चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्ते, गणेश भक्तांवर लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र गणेश भक्तांनी संयम बाळगत पुढची वाट धरली व जटपुरा गेट जवळ पोहचताच चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले व सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करून विनाकारण लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होईस्तोवर इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली. ही घटना कळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आंदोलनस्थळी दाखल झाले व सर्व गणेश भक्तांना शांतता राखण्याचे आवाहन करून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त केली.

मात्र आंदोलनकर्त्या भक्तांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी रेटून धरली असता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस कर्मचारी आदेश रामटेके याला निलंबित केले, व घडलेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक ह्यांना आदेश दिले. घटनास्थळी नेमके काय घडले ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी जयंत टॉकीज चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. अखेरीस चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेत विसर्जन सुरळीतपणे संपन्न होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेतल्याने विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पुढे निघाल्या.

A police constable has been suspended by the District Superintendent of Police for lashing the workers and Ganesha devotees of Chandrapur's Raja Ganesha Mandal.  Moreover, an inquiry has been ordered into the matter through Sub-Divisional Police Officers.  The incident of lathis on the workers and devotees of Ganesh Mandal took place on the main road of Chandrapur city last Friday during a farewell procession to Ganaraya.

According to the received information, like every year, Ganaraya made a grand visit to Chandrapur.  Various congregations worshiped Lord Ganaraya whole week with various appearances.  Yesterday, on Friday, all preparations were made to bid farewell to Ganaraya established by Ganesha Mandals in Chandrapur city.  The police administration also made preparations to maintain peace and order during the immersion procession rally.  After that, the immersion procession started from yesterday evening in the police station.  The procession to bid farewell to Ganesha reached Jayant Talkies Chowk in Raleigh city.  At that time, the procession of Raja Ganesha Mandal of Chandrapur in Jatpura Gate area reached there.  However, the police cleared the way for the Ganesha mandal behind the front mandal to move forward.  When the workers of Raja Ganesh Mandal of Chandrapur asked the police about this, the workers of the mandal alleged that the police started an argument.  Due to this, the atmosphere became tense and the police started attacking the workers and Ganesha devotees of Chandrapur's Raja Ganesha Mandal directly without giving any information to the seniors and without orders.  But Ganesha devotees waited patiently and as soon as they reached Jatpura Gate, the President of Raja Ganesh Mandal of Chandrapur, Deepak Belle and all the activists started a protest and took a stand that they will not leave the place until action is taken against the police who are lathi-charged for no reason.  As soon as the incident came to light, the District Superintendent of Police Arvind Salve entered the protest site and expressed his apologies on behalf of the police administration for the incident by appealing to all the Ganesha devotees to maintain peace.

However, when the agitating devotees rejected the demand for action against the guilty policemen, the District Superintendent of Police immediately suspended Police Officer Adesh Ramteke and ordered Sub Divisional Police Officer Sushil Kumar Nayak to conduct a complete investigation of the incident.  An order has been made to inspect the CCTV camera at Jayant Talkies Chowk for a thorough investigation of what exactly happened at the spot.  Eventually the immersion processions proceeded smoothly as the workers of Raja Ganesh Mandal of Chandrapur withdrew the agitation promising to cooperate for the smooth completion of the immersion.