घुग्घूस : महातरदेवी रस्त्याची कोळशाच्या जडवाहना मुळे अत्यंत भयावह दुर्दशा झाली होती. अनेकांचे अपघाती मृत्यू झाले नागरिक मुठीत जीव घेऊन प्रवास करीत असत अनेक महिन्याच्या जीवघेण्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे. (Ghugus - Mathardevi Road)

आज दिनांक  08 सप्टेंबर रोजी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) व आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांच्या हस्ते सकाळी 10 : 30 वाजता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर, लक्ष्मण सादलावार, जयंता जोगी, मुन्ना लोहानी, शामराव बोबडे, रामपाल वर्मा, ब्रिजेश सिंग, बाबा कुरेशी, यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील.