चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घुस हे औद्योगिक शहर आहे. देशातील अनेक राज्यातील लोक येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे भाजपची सत्ता होती. येथील पुढारी मोठे झाले. मोठ्या पदावर गेले. परंतु, शहराचा विकास झाला नाही. या विघ्नसंतुष्ट लोकांमुळे घुग्घुसच्या विकासात विघ्न आले. त्यामुळे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून विघ्नसंतोषी लोकांना दूर सारावे, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

Ghugus is an industrial town in the district.  People from many states of the country live here in large numbers.  BJP was in power here for many years.  Leaders here grew up.  Gone to a bigger position.  But, the city did not develop.  These disaffected people hindered the development of Ghugus.  Therefore, MP Balu Dhanorkar appealed to stand firmly behind the Congress party for the overall development of this city and drive away the disaffected people.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी साखरवाही घुग्घुस नकोडा उसेगांव (प्रजिमा- 11) किमी. 10/500 ते 11/700 मध्ये दोन पदरी सिमेंट कॉंक्रीट रस्ता, किमी. 11/700 ते 13/100 मध्ये चौपदरी सिमेंट काँक्रीट रस्ता, किमी. 16/00 ते 16/500 व किमी. 17/800 ते 18/700 मध्ये दोन पदरी सिमेंट कॉंक्रीट रस्त्या बांधकाम करण्याकरिता केंद्रीय मार्ग निधी सन 2021-22 अंतर्गत 19 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे खासदार बाळू धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्याहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कार्यकारी अभियंता कुंभे, उपविभागीय अभियंता चंद्रपूर, माजी सभापती दिनेश चोखारे, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन आगदारी, सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद मगरे, कामगार नेते सैय्यद अनवर, इंटक नेते लक्ष्मण सादलावार, शामराव बोबडे, रामपाल वर्मा, ब्रिजेश सिंग, तिरुपती महाकाली, अलीम शेख, मोसीम शेख, शमीउद्दीन शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, सुकुमार गुंडेटी, नुरुल सिद्दिकी, सुनील चिलका, रफिक शेख, शाहरुख शेख, बालकिशन कुळसंगे, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, जावेद कुरेशी, देव भंडारी, साहिल सैय्यद, अविनाश गोगुर्ले, अरविंद चहांदे, कुमार रुद्रारप, आरिफ शेख, कपिल गोगला, राकेश डाकूर, शहजाद शेख, यांची उपस्थिती होती. 

खासदार बाळू धानोरकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने घुग्गुस शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले. त्यात रेल्वे पूल, नवीन नगर परिषद इमारत, शासकीय रुग्णालय यासह अन्य विकासकामांचा समावेश आहे. पुढेदेखील राजकारण न करता घुग्घुस शहराच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने काम करणात येणार आहे. याप्रसंगी अन्य मान्यवरांचीदेखील भाषणे झाली. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.