चंद्रपूर : भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी भाजप महानगरच्या वतीने गणेश मंडळाच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला. या मंडपात लावण्यात आलेल्या बॅनरवर भय्यांना स्थान दिले नाही. केवळ सुधीरभाऊच या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहतील, अशी आयोजकांनी काळजी घेतली.या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत मतभेद बघायला मिळाले.

माजी मंत्री हंसराज अहीर भाजपचे नेते आहेत. सध्या त्यांच्याकडे भाजप ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. जिल्ह्याच्या भाजपमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे वजन आहे. त्यांना मानणारासुद्धा मोठा वर्ग आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहीर यांना पराभव बघावा लागला. त्यानंतर जिल्हा भाजपमधून भय्या विजनवासात गेले. नव्हे, त्यांना एकटे पाडण्यात आले. महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात भाऊनां यश आले. त्यानंतर चंद्रपूर महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. मंगेश गुलवाडे यांच्याकडे आली.  डॉ. गुलवाडे हे मूळचे राजकारणी नाहीत. त्यामुळे त्यांचाकडे कार्यकर्त्यांचीही संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे भाऊंना मानणारे महानगरातील कार्यकर्ते हेच गुलवांडेंचे सोबती. त्यामुळे या सर्वांच्या केंद्रस्थानी केवळ भाऊच आहेत. त्यांमुळे नेहमिच भैयांचा फोटोवर सर्जरी केली जाते. त्यामुळे कधी भाऊंच्या उपस्थितीत, तर कधी अनुपस्थितीत भैयांना कमी वागणूक देण्याची संधी गुलवाडेंच्या टीमने सोडलेली नाही.

तर भय्यांनी आयोजित केलेल्या आंदोलनाकडे नेहमीच पाठ फिरवितात. हा प्रकार मागील काही वर्षांपासून बघायला मिळत आहे. डॉ. गुलवाडेंच्या टीमने मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी गणेश विसर्जन कार्यक्रमात मंडप टाकला होता. या मंडपात लावण्यात आलेल्या बॅनरवर केवळ सुधीरभाऊंचाच फोटो होता. या बॅनरवर भैय्यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे दिवसभर भैय्या किंवा त्यांचे कार्यकर्ते या मंडपाकडे फिरकले नाही.

The internal dispute in BJP has once again come to the fore. On the day of Ganesh Visarjan, a mandap was set up on behalf of BJP Mahanagar to welcome Ganesh Mandal.  Fears were not given a place on the banner placed in this mandap.  The organizers have taken care that only Sudhir Bhau will be at the center of this program.

Former minister Hansraj Ahir is a BJP leader.  Currently, he is holding the post of National Vice President of BJP OBC Division.  Forest Minister Sudhir Mungantiwar has a lot of weight in the BJP of the district.  There is also a large section of people who believe in them.  Ahir had to face defeat in the 2019 Lok Sabha elections.  After that the district went from BJP to Bhaiya Vijanvas.  No, they were isolated.  Bhau was successful in appointing the workers of his choice on the posts of metropolitan and rural district presidents.  After that, the responsibility of Chandrapur Mahanagara President Dr.  Mangesh came to Gulwade.  Dr.  Gulwade is not a native politician.  Therefore, they have the number of workers who can be counted on their fingers. The workers of the metropolis who consider them as brothers are Gulwande's companions.  Therefore, only brothers are at the center of all this.  Because of that, the brothers always get surgery on their photos.  So Gulwade's team has not left an opportunity to treat the brothers less, sometimes in the presence of the brothers, and sometimes in their absence.

But they always turn their backs on the movement organized by Bhaiyas.  This type has been seen for the past few years.  Dr.  The Gulwade team had set up a pavilion in the Ganesh Visarjan program to felicitate the president of the board.  The banner placed in this mandap had only Sudhir Bhau's photo.  Bhaiyas were not given place on this banner.  Therefore, neither Bhaiya nor his workers visited this mandap throughout the day.