चंद्रपूर : वर्धा नदीकाठी असलेल्या पोडसा गावात मध्यरात्री बिबट आला. थेट गोठ्यातील मेंढ्यावर हल्लाबोल केला. मेंढ्याचे ओरडणे बघून मालकाने गोठ्याकडे धाव घेतली. गोठ्यातील दृश्य बघून तो शहारला. बिबट मेढ्यांवर अक्षरशः तूटून पडला होता. त्याने आरडाओरड केली. शेजारी धावून आलेत. तोपर्यंत बिबट्याने सात मेंढ्याना ठार केले होते तर सहा मेंढ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेने गावात दहशत पसरली आहे.

जिल्ह्यातील पोडसा हे गाव गोंडपिपरी तालुक्याचा शेवटचा टोकावर वसले. एका बाजूने वर्धा नदीचे विशाल पात्र तर दुसऱ्या बाजूने जंगल आहे. सध्या शेतात कापुस, सोयाबीन, तूळ पिके उभे आहेत. ही पिके खाण्यासाठी तृणभक्षक वन्यजीव शेत गाठतात. त्यांचा पाठलाग करीत वाघ, बिबट शेतापर्यंत येऊन धडकतात. शुक्रवारचा मध्यरात्री पोडसा गावात बिबट्याने शिरकाव केला. गावातील पत्रू भिवा गोंधळी यांच्या गोठ्यातील मेंढ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात सात मेढ्या ठार झाल्या आहेत तर सहा मेंढ्या जखमी आहेत. या घटनेत गोंधळी यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली आहे. या घटनेने गावात दहशत पसरली आहे.

In the middle of the night, a leopard came to Podsa village on the banks of Wardha river.  Directly attacked the sheep in the cowshed.  Seeing the cry of the sheep, the owner rushed to the cowshed.  He was shocked to see the scene in the cowshed.  The leopard had literally fallen on the rams.  he shouted.  Neighbors came running.  By then the leopard had killed seven sheep and injured six.  This incident has spread terror in the village.

Podsa village in the district is located at the end of Gondpipari taluka.  On one side is the vast basin of Wardha river and on the other side is forest.  At present, cotton, soybeans and tul crops are standing in the fields.  Herbivores approach wildlife farms to eat these crops.  Tigers and leopards chase them and attack the fields.  A leopard entered Podsa village on Friday midnight.  A leopard attacked a sheep in the cowshed of Patru Bhiwa Gandhari of the village.  Seven sheep were killed and six were injured.  In this incident, Ganagri has suffered a lot.  The incident has been reported to the forest department.  This incident has spread terror in the village.