चंद्रपूर : वरोरा शहरातील व्होल्टास सागर कॉलनीमधील एका व्यक्तीला क्रेडिट कार्डचे बिल जास्त आले. त्यामुळे त्यांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान खातेदारास लिंक पाठवून ओटीपी घेतला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून एक लाख 27 हजार पाचशे रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले. याबाबतची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तब्बल 16 महिन्यांनंतर गुजरात राज्यातून आॅनलाइन फसवणूक करणाऱ्यास बेड्या ठोकण्यात वरोरा पोलिसांना यश आले. जतीनभाई प्रद्युनभाई राजगुरू असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे.

येथील व्होल्टास सागर कॉलनीत नितीन काशिनाथ नक्षीने (वय 49) राहतात. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया वरोरा शाखेमध्ये बँक खाते आहे. त्यांना एप्रिल महिन्यातील क्रेडिट कार्डचे बिल ३१ हजार रुपये आले. त्यामुळे नक्षीणे यांनी फोन करून बिलाबाबत विचारणा केली. यावेळी एसबीआय क्रेडीट कार्डमधून बोलतो असे सांगून एक एसएमएस पाठविला. त्यानंतर 8370083898 या क्रमांकावरून खातेदारास फोन केला. एक लिंक आणि एक नंबर पाठविला. पाठविलेला नंबर चारवेळी त्या लिंकवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ओटीपीची माहिती मागितली.

त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार नक्षीणे यांनी सर्व कृती करून ओटीपी क्रमांक सांगितला. यानंतर नक्षीणे यांच्या बँक खात्यातून पहिल्यांदा 99 हजार, नंतर 28 हजार 500 असे एकूण एक लाख २७ हजार पाचशे रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले. बँकेतून आॅनलाइन पैसे काढण्यात आल्यानंतर नक्षीणे यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना 13 मे 2021 मध्ये घडली होती. वरोरा पोलिसांनी तक्रारीवरून भांदवि 419, 420 कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सायबर सेलची तांत्रिक मदत घेण्यात आली. त्यानंतर आॅनलाइन फसवणूक करणार गुजरात राज्यातील असल्याची माहिती मिळाली. वरोरा पोलिसांचे एक पथक गुजरात राज्यात गेले. त्यानंतर भावनगर जिल्ह्यातील तलग जालगा महुआ येथून जतीनभाई प्रद्युनभाई राजगुरू याला अटक केली.

A person from Voltas Sagar Colony in Warora town got a high credit card bill. So he inquired. During the inquiry the OTP was taken by sending the link to the account holder. After that one lakh 27 thousand five hundred rupees was withdrawn from his bank account online. A complaint was lodged in Warora police station. After that, the police started an investigation.  After almost 16 months, Warora Police succeeded in arresting an online fraudster from the state of Gujarat.  The arrested person has been identified as Jatinbhai Pradyunbhai Rajguru.

Nitin Kashinath Nakshine (age 49) lives in Voltas Sagar Colony here.  He has a bank account in State Bank of India Warora branch.  He received a credit card bill of 31 thousand rupees for the month of April.  So Nakshine called and asked about the bill.  This time an SMS was sent saying that SBI is talking about credit card.  Then called the account holder from the number 8370083898.  Sent a link and a number.  Asked to send the sent number four times to that link.  Then asked for OTP information.

According to the person, Nakshine took all the steps and gave the OTP number.  After this, first 99 thousand, then 28 thousand 500, a total of 1 lakh 27 thousand five hundred rupees were withdrawn online from Nakshine's bank account.  After the money was withdrawn from the bank online, Nakshine filed a complaint at Varora police station.  This incident took place on May 13, 2021.  Warora police registered a case under Section 419, 420 of IPC based on the complaint and started investigation.

Technical assistance of Cyber ​​Cell was taken.  After that, we got information that online cheats are from Gujarat state.  A team of Varora Police went to the state of Gujarat.  Then Jatinbhai Pradyunbhai Rajguru was arrested from Talag Jalga Mahua in Bhavnagar district.