चंद्रपूर : आसाममधील गुवाहाटीपासून सुरु झालेल्या ‘50 खोके, एकदम Ok’च्या घोषणा विधीमंडळाच्या पायऱ्यांपर्यंत पोहचल्या. आज शुक्रवारी गणेशाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत राज्यातील सत्तांतराचे प्रतिबिंब उमटणार आहे. खास गणेश भक्तांसाठी '50 खोके एकमद Ok'च्या टि-शर्ट बाजारात विकायला आल्या आहेत. काही उत्साही गणेश भक्तांनी विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच या टी-शर्ट घालून माध्यमांवर आपल्या छायाचित्रांचे लोकार्पणसुद्धा केले आहे.

शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. बंडखोर आमदारांनी गुवाहाटी व्हाया गुजरात असा प्रवास केला. गुवाहाटीत बराच काळ तळ ठोकला. तेव्हापासून 50 खोके़... एकमद Okची चर्चा सुरु झाली. हा वाक्यप्रचार राजकीय वर्तुळासोबतच समाजात आणि समाज माध्यमांतसुद्धा चांगलाच चर्चेला आला. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात राज्यात नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात ‘50 खोके....एकदम Ok...’ च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले.

यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये झोंबाझोंबी सुद्धा झाली. ही घोषणा सत्ताधाऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर झालेल्या दही हंडी, पोळा, मारबत मिरवणुकीतसुद्धा ही घोषणा लोकप्रिय ठरली. आता गणेशोत्सवातदेखील सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी असताना सांगोल्याचे आमदार शाहजी बापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल.. सार ओके मंधी..’ हे वाक्य चांगलेच चर्चेत आले. समाज माध्यमांत तर बरेच दिवस याचीच चर्चा होती. पाटील यांच्या या वक्तव्याचा आधार सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी विरोधक घेत आहेत.

आज गणेश विसर्जन होईल. राज्यातील अनेक शहरांत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत देखावे सादर करण्याची परंपरा आहे. याच देखाव्यात 50 खोके, एकदम Okच्या टी-शर्ट घातलेली मंडळी बघायला मिळेल. या वाक्यप्रचारालाच सध्या चांगलाच भाव आला आहे. त्यामुळे कपडा विक्रेत्यांनीसुद्धा ही संधी सोडली नाही. 50 खोके-एकदम Ok लिहिलेल्या टी-शर्ट बाजारात विकायला आणल्या आहेत. केवळ चंद्रपूर शहरातच नव्हे तर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा त्या उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांनी त्या घालून समाज माध्यमांवर आपले छायाचित्र सुद्धा टाकले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत गणपती बाप्पा मोरया. सोबतच 50 खोके एकदम Okच्या घोषणा उद्या ऐकायला मिळणार आहेत.

The slogans of '50 Khoke, Ok', which started from Guwahati in Assam, reached the steps of the Legislature.  Today Friday, while bidding farewell to Ganesha, the immersion procession will reflect the transition of power in the state.  Specially for Ganesha devotees, '50 Khoke Ekmad Ok' T-shirts have come for sale in the market.  Some enthusiastic Ganesha devotees have even released their photographs on the media wearing these T-shirts on the eve of immersion.

There was a vertical split in the Shiv Sena and the Maha Vikas Aghadi government in the state collapsed.  The rebel MLAs traveled to Guwahati via Gujarat.  Camped in Guwahati for a long time.  Since then the discussion of 50 Khoke... Ekmad Ok started.  This phrase was widely discussed in the political circles as well as in the society and in the social media.  A new government was formed in the state under the leadership of Eknath Shinde.  After that, in the very first session of the Legislature, the opposition brought the ruling party down by chanting slogans of '50 Khoke....Ekdam Ok...'.

Due to this, the MLAs of the ruling and opposition parties also got into a frenzy.  This announcement was well liked by the rulers.  This slogan also became popular in Dahi Handi, Pola and Marbat processions that followed.  Now it is being used in Ganeshotsav also to distract the rulers.  During the MLA's stay in Guwahati, the words of Sangola MLA Shahji Bapu Patil, 'Kay zadi, kay dongar, kay hatel.. saar ok mandhi..' were widely discussed.  This was discussed in the social media for a long time.  Patil's statement is being used by the opposition to bring down the rulers.

Ganesha Visarjan will take place today.  Immersion processions will be held in many cities of the state.  There is a tradition of performing scenes in this procession.  In this scene, you will see 50 Khoke, people wearing OK T-shirts.  This phrase itself has got a good value at present.  So even the clothing sellers did not leave this opportunity.  50 Khoke of t-shirts with 'OK' written on them are sold in the market.  They have become available not only in Chandrapur city but also in taluka places.  Many people have also posted their pictures on social media wearing them.  So Ganapati Bappa Morya in the immersion procession.  Along with this, 50 Khoke are going to be announced Today.