गणपती पाण्यात नीट बुडाल्याची खात्री करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी येथील महागाव येथे गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. गणपती पाण्यात नीट बुडाला की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पाण्यात गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी मृत मुलांची नाव आहेत. या घटनेने असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोन जण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते.गणपती विसर्जन केल्यानंतर ते घरीही परतले. पण गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी दोघेजण पुन्हा नाल्यावर गेले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण नाल्यात बुडाले. दोघांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी 20 मिनिट दोन्ही मुलांना बघितलेच नाही, ऑक्सिजन लावले नाही. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे आमच्या मुलांचे मृत्यू झालआ असा गंभीर आरोपी मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.Yavatmal: An unfortunate incident took place during Ganpati immersion at Mahagaon in Arni in the district. Two boys who went back into the water to see if Lord Ganesha drowned properly, drowned in the stream. The deceased children have been identified as Gokul Datta Teter and Sopan Babanrao Gawande. Due to this incident, mourning has spread over the entire village.
More information about this is that two people went to the canal with their friends to immerse the Lord Ganesha. But the two men again went to the drain to see if Ganapati had drowned. But as the water flow was high, both of them drowned in the drain. Both were taken out immediately and admitted to Arni Rural Hospital. But doctors declared him dead.
The family alleges that the death was due to negligence of the doctor
When Arni was admitted to the rural hospital, the doctor did not look at both the children for 20 minutes and did not administer oxygen. The relatives of the deceased have made a serious accusation that our children died due to the negligence of the doctors. Due to this, an atmosphere of tension was created in Arni Rural Hospital.