सर्वधर्मीय महाआरतीच्या माध्यमातुन सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश - सुधीर मुनगंटीवार
घुग्घुस : लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांविरूध्द जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सद्भावना, सलोखा, सामाजिक समरसता, बंधूभाव आणि राष्ट्रप्रेम अशा सर्व भावनांनी ओतप्रोत गणेशोत्सव साजरा होणे आज अपेक्षित आहे. देवराव भोंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी श्री गणेशाची सर्वधर्मीय महाआरती आयोजित करून सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातुन समाजसेवेचा, लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचेल असा विश्वास वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
The popular Tilak organized public Ganeshotsava to spread awareness against the British. Ganeshotsav is expected to be celebrated today filled with all the feelings of goodwill, harmony, social harmony, brotherhood and patriotism. Devrao Bhongle and his colleagues have given a unique message of social unity by organizing pan-religious Mahaarti of Lord Ganesha. Forest and Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar expressed the belief that through this Ganeshotsava, the message of social service and public welfare will reach the common people.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी श्री जय श्रीराम गणेश मंडळातर्फे सर्वधर्मीय महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ही महाआरती सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासह हिंदु धर्म, बौध्द धर्म, सिख धर्म, ख्रिश्चन धर्म मुस्लीम, धर्मातील प्रतिनिधींनी देखील श्री गणेशाची महाआरती केली.
हिंदु धर्माच्या वतीने पंडीत गौरीशंकर मिश्रा, पं. अनिल त्रीपाठी, पं. वर्मानंद चौबे, पं. गजानन चिंचोलकर, पं. दिपक पांडे, प्रदीप कोहळे, मधुकर मालेकर
बौध्द धर्माच्या वतीने भंते रत्नमणी, रामचंद्र चंदनखेडे, अनिरूध्द आवळे, दिलीप कांबळे, श्रीनिवास कोट्टूर, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, भारत साळवे, भानुदास गंगाधरे, अजय आमटे, निरंजन नगराळे, अरुण साठे, दिलीप कांबळे
ख्रिश्चन धर्माच्या वतीने बिसप श्यामसुंदर नायडू, पास्टर आनंद गुंडेटी, वेलती कलगुर, पास्टर प्रभाकर कंडे
मुस्लीम धर्माच्या वतीने शेख हनीफ, मोहम्मद इशहाक, मकसुद भाई, इम्तियाज अहमद, रज्जाक शेख, मुज्जू लोहानी, खलील अहमद, मकसुद भाई, शेख मुस्तफा, वसीम भाई, वाहीद अली, हसन शेख, नईम खान, अन्वर खान
सिख धर्मीयांच्या वतीने जतींदर सिंग दारी, गुरजीत सिंग, गुरपाल सिंग, प्रदीप सिंग, प्रीतम सिंग यांनी महाआरती केली. शिव चौहान यांच्या भजन मंडळाने सुमधुर भजनाने मंत्रमुग्ध केले.