थकबाकी असल्याने मनपाने केले दोन गाळे सील
चंद्रपूर : महानगरपालिका कर विभागाअंतर्गत विशेष पथकांनी थकबाकी असलेले दोन मार्केट गेले सील केले आहेत. सदर दोन्ही गाळे मनपाच्या मालकीचे असुन त्याचा वापर करण्यात येत नव्हता.
दोन्ही गाळे राजकला मार्केट येथील असुन मार्केट मधील वरच्या मजल्यावर असलेले गाळा क्र. ४A / ७७ यावर रुपये ६,३३,८९० ची थकबाकी आहे. तसेच किशोर हुड गाळा क्र. गाळा क्र. १३१३/४ यांच्याकडे रुपये १,७९,२२९ वसुली आहे. सदर गाळेधारकांना मनपातर्फे वारंवार सुचना देण्यात आल्या. मात्र त्यांनी कराचा भरणा न केल्याने दोन्ही गाळे सील करण्यात आले.गाळे सील करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी गाळेधारक गुंजन बाफना यांच्यातर्फे मेंढे यांनी रुपये २,७१,४५० चा धनादेश देऊन सील प्रक्रिया टाळली.
सदर कारवाई दरम्यान सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, कनिष्ठ अभियंता नरेंद्र पवार, आशीष भारती, लक्ष्मण आत्राम, प्रशांत पिंपळकर,मयुर मलिक, संजय बनकर, हंसराज येरेवार व अतिक्रमण कर्मचारी उपस्थीत होते. जप्तीची कारवाई टाळण्यास त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फ़े करण्यात येत आहे.
Chandrapur: Special teams under the Municipal Tax Department have sealed two outstanding market gates. Both the said pits were owned by the municipality and were not being used.
Both the pits are located at Rajkala Market and the upper floor of the market is pit no. 4A / 77 has arrears of Rs.6,33,890. Also Kishore Hood filter no. Filter no. 1313/4 has a recovery of Rs.1,79,229. The Municipal Corporation has repeatedly given instructions to the owners of said scum. But as they did not pay the tax, both the plots were sealed. In order to avoid the process of sealing the plots, Mendhe avoided the sealing process by giving a check of Rs.
Assistant Commissioner Narendra Bobhate, Junior Engineer Narendra Pawar, Ashish Bharti, Laxman Atram, Prashant Pimpalkar, Mayur Malik, Sanjay Bankar, Hansraj Yerewar and encroachment staff were present during the said operation. An appeal is being made by the Chandrapur Municipal Corporation to pay the tax quickly to avoid confiscation action.