आप घुग्घुस शहरउपाध्यक्षाने धरला काँग्रेसचा हात
Chandrapur Tak
घुग्घूस : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे पासून प्रेरित होऊन तसेच माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष अभिषेक सपडी यांनी आज दिनांक 29 डिसेंबर रोजी जनसंपर्क कार्यालयात अधिकृतपणे प्रवेश घेतला.
काँग्रेस पक्षाचे गमछा गळ्यात टाकून त्यांचा प्रवेश घेण्यात आला तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतालवार, विजय माटला, अनुप भंडारी, आकाश चिल्का, रफिक शेख, देव भंडारी, साहिल सैय्यद, कुमार रुद्रारप, शहजाद शेख, कपिल गोगला, हरीश कांबळे, विजय रेड्डी, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.