सात महिण्यापासून सिमेंट घेतलेच नाही ; तरीही आरोप

घुग्घूस (चंद्रपूर) : सात महिण्यापासून रेड्डी यांनी सिमेंट घेतलेच नाही,असे असताना महातारदेवी येथील जुनेद खान यांच्या ले - आऊट मध्ये आढळून आलेल्या नॉट फॉर रिसेल सिमेंट प्रकरणात नाहक रेड्डी यांचे नाव गोवल्या जात आहे. ही पहिलीच वेळ नाही. या आधीही रेड्डी यांच्यावर खोटा आरोप केला गेला. या षडयंत्र मागे नेमका कुणाचा हात आहे याची चर्चा होत असताना शहारातील राजकीय क्षेत्रात रेड्डी यांचे नाव चर्चिले जात आहे, याच पोटदुखीतून रेड्डी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप रेड्डी यांचे पदाधिकारी करीत आहेत.

शहरातील काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी हे एसीसी कंपनीतील सिव्हिल कॉन्ट्रक्टर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सतत नॉट फॉर रिसेल सिमेंट प्रकरण हे चर्चेत येत असते किंबहुना आणले जात आहे.

आता तर 700 रुपये किंमतीच्या अडीच पिशव्या सिमेंट महातारदेवी येथील जुनेद खान यांच्या ले - आऊट मधून पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी S - RAJ च्या पिशव्या जप्त केल्या. सदर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी 26 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला भेट दिली व सिमेंट पिशव्याचे निरीक्षण केले, असता रिकाम्या पिशव्या व भरलेल्या पिशव्या वेगवेगळ्या महिन्याचे आढळून आल्या. तसेच भरलेल्या सिमेंट पिशव्या एक वर्ष जुना असल्याचे दिसले एका वर्षांपूर्वीचा सिमेंट वापरला जाऊ शकतो काय ? सिमेंट पिशवीची सिलाई हे बनावटी असल्याची स्पष्टपणे जाणवली तसेच या पिशवीत वजनापेक्षा जास्त सिमेंट असल्याचे निर्देशनास आले.सदर सिमेंट संदर्भात साईराज सिव्हिलचे कंत्राटदार राजूरेड्डी यांच्याशी माहिती घेतली असता त्यांनी गेल्या सात महिन्यापासून कंपनीतर्फे बाहेरील कामाकरिता सिमेंट घेतलेच नसल्याचे व आगस्ट महिन्यात तलवारीच्या बळावर एसीसी कंपनीतुन सिमेंट चोरी झाल्याची माहिती दिली.

रेड्डी यांनी कंपनी तर्फे सिमेंट घेतले नाही तर मग सिमेंट पिशव्या मिळाल्याच कश्या ? सदर सिमेंट  मोठ्या "विवेकतेने" त्याठिकाणी पोहचलाच कसा? हजारो रुपये सामाजिक कार्यात खर्च करणाऱ्या रेड्डी यांना सातशे रुपयांच्या सिमेंट प्रकरणात अडकवून कुणाचा लाभ होणार आहे? पोलीस तपास जर योग्य दिशेने झाला तर खरे आरोपी बाहेर येतील मात्र ठाणेदारा सोबत काँग्रेस पदाधिकऱ्यांचा झालेला राडा हे तपास समाधानकारक  नसल्याची ग्वाही देत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी जिल्ह्यातील मंत्री यांनी एसीसी कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना रेड्डी यांच्यावर कारवाई करा  त्याला एसीसी कंपनी बाहेरचा रस्ता दाखवा लक्षात ठेवा "अदानी" आता आमचा आहे असा दम दिला यावेळी जिल्हाध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित होते.यांचे लॉयड्स मेंटल्स, गुप्ता कोल वॉशरीज, गोपाणी सह अनेक उद्योगात ठेके आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा कोळसा चोरी प्रकरणाचा भांडाफोड ही झाला होता. हे आता व्यवसायाने ठेकेदार असलेल्या सामाजिक तसेच राजकीय नेत्यांला आर्थिकरीत्या नेस्तनाबूत करण्यासाठी कंपनीला बंद पाडण्याची धमकी देत असल्याचे ही कळाले. या नॉट फॉर रिसेल प्रकरणाचा भांडाफोड करायचा असल्यास विवेकनम, गणेशनम, संजनम, कुकडम यांच्या मोबाईलचा CDR तपासल्यास खरे आरोपी अलगद मिळतील.

While Reddy has not taken cement for seven months, Nahak Reddy's name is being implicated in the case of not for resale cement found in the layout of Junaid Khan in Mahatardevi.  This is not the first time.  Even before this Reddy was falsely accused.  Reddy's name is being discussed in the political sphere of the city while there is a discussion about who exactly is behind this conspiracy.

 Rajureddy, the city president of the Congress party in the city, is a civil contractor with the ACC company.  For the past five years, the issue of not for resale cement has been in the news.

 Now two and a half bags of cement worth Rs 700 were seized by the police on December 23 under the guidance of Police Inspector Babanrao Pusate from Juned Khan's layout in Mahatar Devi.  To get information about the matter, journalists visited the police station on December 26 and inspected the cement bags, while empty bags and full bags of different months were found.  Also the filled cement bags were found to be one year old. Can one year old cement be used?  It was clearly felt that the stitching of the cement bag was fake and it was pointed out that there was more cement than its weight in this bag. Regarding the cement, Rajureddy, the contractor of Sairaj Civil, was informed that he had not taken cement from the company for the last seven months and that the cement was stolen from the ACC company at gunpoint in the month of August.  gave

If Reddy did not take the cement from the company, then how did he get the cement bags?  How did the said cement reach there with great "prudence"?  Reddy, who spends thousands of rupees in social work, will get involved in the cement case of seven hundred rupees, who will benefit?  If the police investigation is done in the right direction, the real accused will come out, but the rada of Thanedara and the Congress office-bearers proves that the investigation is not satisfactory.

 According to the sources, on Saturday, the Minister of the district told the chief officers of ACC Company to take action against Reddy. Remember, show him the way out of ACC Company. Remember that "Adani" is now ours. District President and Regional Vice President were present at this time.  Many industries have contracts.  A few months ago, there was a scandal in their coal theft case.  It was learned that now the business is threatening to shut down the company to financially wipe out the social as well as political leaders who are the contractors.  If you want to bust this Not for Resale case, if you check the CDR of the mobiles of Vivekanam, Ganeshnam, Sanjanam, Kukdam, the real accused will be identified.