चंद्रपूर : भद्रावती नगरपालिका  क्षेत्रातील घुटकाडा वार्ड येथील 12 क्रमांकाच्या घंटागाडीमध्ये गुरुवारी सकाळी प्लास्टिकच्या पिशवीत नवजात अर्भक आढळून आल्याने भद्रावती शहरात पुन्हा खळबळ माजली आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी येथील चंडिका मंदिर परिसरात एक अर्भक आढळून आले होते.

कोणीतरी अज्ञाताने त्या घंटागाडीमध्ये अर्भक टाकले व ते मृत अवस्थेत आढळून आले आहे. बारा नंबरची घंटागाडी ही गुरुनगर, घुटकाडा, शिवरकर सोसायटी, दाते प्लॉट, ठेंगे प्लॉट या परिसरामध्ये फिरते. 

या परिसरातील ओला व सुका कचरा जमा करते. त्या गाडीमध्ये हे मृत बालक मिळाले असल्याने एकच खळबळ माजली आहे.