जिद्द, परिश्रमाने रवी किन्नाके बनला उद्योग निरीक्षक
घुग्घुस (चंद्रपूर) : येथील अमराई वॉर्डात राहणाऱ्या आदिवासी समाजातील होतकरू युवकाने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर दिवसरात्र घेतलेले परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. हा युवक उद्योग निरीक्षक पदावर रुजू होणार आहे. रवी किन्नाके असे या तरुणाचे नाव आहे. आमराई वॉर्डात राहत असलेल्या रवी किन्नाके याची परिस्थिती बेताची. वडील एसीसी कंपनीत कार्यरत आहे.
आमराईसारख्या मागास क्षेत्रात शैक्षणिक वातावरणही नव्हते. मात्र, बिकट परिस्थितीवर मात करून त्याने शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा त्याने दिली. त्यात तो उर्तीर्ण झाला. उद्योग निरीक्षक या पदावर तो आता रुजू होणार आहे. त्याचा नुकताच काँग्रेसने सत्कार केला. याप्रसंगी कॉंग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, सय्यद अनवर यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. याप्रसंगी अलीम शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
An ambitious youth from the tribal community living in Amrai Ward here has cleared the Maharashtra Public Service Commission exam with the strength of his indomitable willpower, hard work day and night, determination and perseverance. This youth will join the post of industry inspector. The name of this young man is Ravi Kinake. The situation of Ravi Kinake, who lives in Amrai ward, is desperate. Father is working in ACC company.
In backward areas like Amrai, there was no educational environment. However, he overcame the difficult situation and studied. He cleared the Maharashtra Public Service Commission exam. He passed in it. He will now join the post of Industry Inspector. Congress felicitated him recently. On this occasion, Congress President Rajureddy, Syed Anwar visited his residence and felicitated him with a bouquet of flowers. Aleem Sheikh, Roshan Dantalwar, Rohit Dakur and other officials were present on this occasion.