पोलीस चौकी समोर WCL कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या दरोडेखोराना तातळीने अटक करा
घुग्घूस : वेकोलीच्या मुंगोली पैनगंगा खाणीत घुग्घूस येथील कर्मचारी रात्रीपाळीत ये - जा करीत असतात गेल्या अनेक दिवसांपासून या कर्मचाऱ्यांना नकोडा येथिल पोलीस चौकी समोर लुटल्या जात आहे. यागावगुंडांना पोलिसांचा ही धाक उरला नसल्याने लुटमारीची घटना व जीवघेण्या हल्ल्यात वाढ झाली आहे.
सदर घटनेतील दरोडेखोरांना तातळीने अटक करा व नकोडा येथील पोलीस चौकी सुरू करा या मागणीला घेऊन शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यावतीने ठाणेदार बबनराव पुसाटे यांना निवेदनातून करण्यात आली.
इंदिरा नगर वसाहतीत राहणारे राजू गज्जेली वय 55 वर्ष हे मुंगोली खाणीत वेजब्रिज कारकून पदावर कार्यरत असून 29 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या वेळेस कामावर जात असतांना नकोडा बस स्थानक व पोलीस चौकी जवळ दोन अज्ञात आरोपींनी अडवून पैश्याची मागणी केली आपल्या जवळ फक्त पन्नास रुपयेच असून ते तुम्ही घेऊन घ्या असे सांगताच आरोपींनी लाकडी दांड्याने जबर मारहाण केली.
त्यांच्या वाहनांची तोड - फोड करून त्यांच्या जवळचे साहित्य लुटून पळ काढला. गंभीररित्या घायाळ झालेल्या गज्जेली यांना उपचारासाठी राजीव रतन दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन घटना समजून घेतली व त्यांना धीर दिला. यापूर्वी संतोष पिंपळकर, राजू मानमोडे सह अन्य वेकोलीकर्मीना ही लुटण्यात आले. यामुळे वेकोली कर्मचाऱ्यांन मध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरात सध्या गुंडांगर्दी व लूटमार वाढत आहे. दरोडेखोरांना तातळीने अटक न केल्यास व नकोडा पोलीस चौकी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, कामगार संघटनेचे ए.आय.टी यु.सी नेते तिरुपती महाकाली, अलीम शेख, रोशन दंतालवार, अनुप भंडारी, रोहित डाकूर, रफिक शेख, देव भंडारी, साहिल सैय्यद व मोठ्या संख्येने उपस्थित होते.