नवजात बालकाचा विक्रीचा प्रयत्न ; रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकांत दोन महिण्याच्या नवजात बालकाची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. बालकाची 10 हजार 500 रूपयांमध्ये विजयवाडा येथे विक्री करणार होते.रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चंद्रकांत मोहन पटेल (40) मुंबई, दौपदी राजा मेश्राम, (40) आयबीएम नागपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
25 डिसेंबरला 12655 या क्रमांकाच्या नवजीवन एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक 5 व 6 मध्ये एक दाम्पत्य नवजात बालकाला सोबत घेत प्रवास करीत होते. सदर दाम्पत्य हे विजयवाडा येथे जात होते. सदर दाम्पत्य हे नवजात बालकांची तस्करी करून विक्री करण्यासाठी नेत असल्याची तक्रार नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. तात्काळ बल्लारपूर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान रेल्वेचे पोलिस अधिकारी बोगीमध्ये जावून चौकशी केली असता त्यांनी स्वतःला पती-पत्नी असल्याचे सांगितले.
मात्र त्यांच्यासोबत असलेले 2 महिन्याचे नवजात बालक हे सतत रडत असल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करीत मोबाईल तपासून पाहिला असता, त्यामध्ये मुलाला विजयवाडा येथे विक्री करणार असल्याचे नमदू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनीही नवजात बाळाला विक्री करणार असल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपी हे 10 हजार 500 रूपयांना नवजता बाळाची विक्री ही विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याकडे करणार होते. ही कारवाई रेल्वे पोलीस मानव तस्करी विभागाचे प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, रेल्वे पोलीस राठोड यांच्या पथकाने केली आहे.
Ballarpur Railway Police have arrested two people who were trying to smuggle and sell a two-month-old newborn baby in Ballarpur railway station. The child was going to be sold in Vijayawada for 10 thousand 500 rupees. The railway police has arrested two people. The arrested accused have been identified as Chandrakant Mohan Patel (40) Mumbai, Daupadi Raja Meshram, (40) IBM Nagpur.
On December 25, a couple was traveling with a newborn child in coach number 5 and 6 of Navjeevan Express number 12655. The said couple was going to Vijayawada. The Nagpur Railway Police received a complaint that the said couple was smuggling newborn babies for sale. The incident was immediately reported to the Ballarpur Railway Police. Meanwhile, when the railway police officer went to the bogie and questioned them, they said that they were husband and wife. However, the 2-month-old baby with him kept crying, so the police detained him for questioning. Meanwhile, when the police thoroughly investigated and checked the mobile phone, it became clear that the boy was going to be sold in Vijayawada. The police admitted that both of them were going to sell the newborn baby. Both the accused were going to sell the newborn baby to Yunus and Mumtaz of Vijayawada for 10 thousand 500 rupees. This action has been taken by the team of Praveen Mahajan, Sanjay Sharma, Singh, Railway Police Rathod of Railway Police Human Trafficking Department.