ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार पती ठार ; पत्नी गंभीर
बोरचांदली पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळला
चंद्रपूर : मूल-चामोर्शी मार्गावरील बोरचांदली पुलावर ट्रॅक्टर व दुचाकी मध्ये आज रविवारी (1 जानेवारी 2023) ला सकाळी भीषण अपघात घडला. यामध्ये देवदर्शनाकरीता निघालेल्या दुचाकीस्वार पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागे बसलेली महिला पत्नी ही गंभीर जखमी झाली. तर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पुलाखाली कोसळल्याने जखमी झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ही घटना घडल्याने मूल येथे हळहळ व्यक्त होत आहे. गणपत आगडे असे मृतक पतीचे तरन सुरेखा आगडे असे जखमी पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत आगडे हा मुल मधील तेलीमोहल्ला येथील रहिवासी होता. आज रविवारी वर्षाचा पहिला दिवस असल्याने दुचाकीने पत्नी सुरेखासह दोघेही चामोर्शी मार्गाने महाकाली मंदिरात देवदर्शनाकरीता निघाले होते. सोबतच घरचे पुजेचे साहित्य विसर्जन करण्याकरीता घेतले होते. बोरचांदली येथील पुलावर पोहचल्या नंतर पुजेचे साहित्य विसर्जन करण्याकरीता दुचाकी बाजूला करून थांबले. त्यानंतर ते साहित्य विसर्जन करीत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रक्टने आगडे दाम्पत्याला जबर धडक दिली. यामध्ये पतीन गणपत आगडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली. भरधाव वेगात चालवित असलेला चालक किशोर गुणाजी पोरटे रा. मुरखळा (ता.चामोर्शी) हा ट्रक्टर घेऊन पुलावरून नदीखाली कोसळला. यामध्ये चालक जखमी झाला. घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन जखमी पत्नी सुरेखा व ट्रक्टर चालकाला मूल येथील रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. नवीन वर्षात झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.