'मिशन 145 विजय संकल्पा’ची सुरुवात चंद्रपुरातून
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळेच देशातील सर्वसामान्यांना न्याय मिळाला असून, त्याच जोरावर भाजपचे ‘मिशन 145’ यशस्वी होईल आणि चंद्रपूरच्या विजयापासून त्याला प्रारंभ होईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. चंद्रपुरात ‘मिशन 145 विजय संकल्प’ मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.
भाजपच्या ‘मिशन 145 विजय संकल्पा’ची महाराष्ट्रातील चंद्रपुरातून सोमवारी (दि. 2) सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, मनोज कोटक, संदीप रेड्डी व भाजप पदाधिकार्यांची उपस्थिती होती. माता महाकाली आणि स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांना स्मरण करून जे. पी. नड्डा यांनी भाषणाला सुरुवात केली.
BJP National President J. P. Nadda did. Speaking at the launch of 'Mission 145 Vijay Sankalp' campaign in Chandrapur, he also criticized Uddhav Thackeray in harsh words.
BJP's 'Mission 145 Vijay Sankalpa' was launched from Chandrapur in Maharashtra on Monday (2nd). He was speaking in a public meeting on this occasion. On this occasion, National Coordination Minister Shiv Prakash, Forest and Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar, BJP Maharashtra State President Chandrashekhar Bawankule, former Union Minister of State for Home Affairs Hansraj Ahir, MP Ashok Nete, MP Ramdas Tadas, MP Anil Bonde, Manoj Kotak, Sandeep Reddy and BJP officials were present. Remembering Mata Mahakali and independence hero Baburao Shedmake. P. Nadda started the speech.