विरोधकांचे मनसुबे हाणून पाडा
खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
चंद्रपूर : एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. सध्या मागील आठ वर्षात केंद्रात सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचा अपप्रचार होत आहे. यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार प्रभावीपणे पुढे मांडून विरोधकांचे मनसुबे हाणून पाडावे असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
आज चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर - वणी- आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर (जिल्हा) शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, दिनेश चोखारे, घनश्याम मूलचंदानी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, सुनिता लोढीया, विजय नळे, अश्विनी खोब्रागडे, विनोद अहिरकर, सोहेल रजा, राजेश अडूर, यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, पंतप्रधानांनी खासदारांचे अनेक अधिकार कोटे काढून घेतले आहेत. केंद्रीय विद्यालय प्रवेश, रेल्वे आरक्षण कोटा रद्द करून खच्चीकरण सुरु आहे. यु. पी मध्ये राहुलजींना प्रधानमंत्री झाले तर काय कराल असा सवाल एक पत्रकाराने विचारला असता. त्यावेळी त्यांनी शिक्षण प्रणालीवर विशेष लक्ष देणार, त्यासोबतच धर्मा धर्मात विखुरलेला भारत जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारने क्रीडा धोरण जाहीर केले आहे. तिथे भविष्य उज्वल आहे. मात्र, महाराष्ट्रात स्पष्ट धोरण नाही. कर्नाटकची लोक म्हणतात महाराष्ट्राचा हा भाग आमचा आहे. सीमा प्रश्नांमुळे, देश अशांततेकडे चालला आहे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर केंद्र सरकारचे बंधने आहेत. पुढे ते म्हणाले कि, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या रविवारी बैठकीच्या माध्यमातून चर्चा घेत जाऊ. यात सर्व युवा, महिला, पदाधिकारी यांच्या समावेश राहील. पुढे देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या विचार घराघरात पोहचविण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. त्याकरिता काँग्रेसचा विचार पुढे ठेऊन विरोधक जे अपप्रचार करीत असतात तो हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
On the one hand, inflation has increased significantly. Life has become difficult for common citizens. At present, after coming to power at the Center in the last eight years, Congress is spreading propaganda through social media. On this, MP Balu Dhanorkar urged the Congress workers to put forward the party's views effectively and thwart the intentions of the opposition.