आमदारांसाठी विमान पाठवता, आता बेल वाजवता, 'ये ना चालबे'
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या
सहा मिनिटाची चित्रफित सताजमाध्यामावर व्हायरल
चंद्रपूर : सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता, आता अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रश्न मांडताना बेल वाजवता, 'ये ना चालबे' अशा कानपिचक्या सत्ताधिकाऱ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकत्याच नागपूरात पार पडलेल्या अधिवेशनात दिल्या आहेत. त्यांची 6 मिनिट 20 सेकंदांची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा देणारे आ. जोरगेवार यांनी यापुढेही तुम्हाला मत पाहिजे असल्यास तुम्हीच सर्वांत पहिले विमान पाठवणार, असेही त्या चित्रफितीत म्हटले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मुद्दयांवर चर्चा करताना आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेक समस्या मांडल्या. त्यामध्ये त्यांनी सत्ताधिकाऱ्यांना कानपिचक्याचे देण्याचे सोडले नाही. सोबतच चंद्रपूर एमआयडीसीतील भूखंडांची आकडेवारी सादर करून उद्योगांची दुरावस्था सरकारच्या लक्षात आणून दिली. विद्यापीठातील पदवीला कवडीची किंमत नसल्याने शैक्षणिक सुविधा वाढवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांचे भाषण सुरू असताना बेल वाजवून थांबविण्याचा प्रयत्न केल्याने सत्ता स्थापन करताना आमदारांसाठी विमान पाठवता, आता अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न मांडताना बेल वाजवता, “ये ना चालबे, या शब्दांत आ. ओरगेवार यांनी सरकारचे चिमटे काढल्याचे त्यांच्या अधिवेशनातील भाषणाच्या चित्रफीतीत लक्षात येत आहे.
MLA Kishore Jorgewar, who used to send airplanes for the MLAs during the formation of the government, now rings the bell while raising the issues of Chandrapur district in the convention, 'Ye Na Chalbe' has been given by MLA Kishore Jorgewar in the recently held convention in Nagpur. His 6 minute 20 second clip has become quite popular after it went viral on social media. BJP-Shiv Sena (Shinde group) supporting the government. Jorgewar also said in the video that if you still want votes, you will send the first plane.
While discussing various issues in Chandrapur district in Nagpur winter session, MLA Kishore Jorgewar raised many problems. In that, he did not stop to give earpieces to the rulers. Along with this, by presenting the statistics of plots in Chandrapur MIDC, the plight of the industries was brought to the notice of the government. At this time, he demanded that the educational facilities should be increased as the degree in the university is not worth the money. Trying to stop him by ringing the bell while he was speaking, sending a plane for the MLAs during the formation of the government, now ringing the bell while raising important issues of Chandrapur district in the session, “Ye na Chalbe, come in these words. The tapes of Orgewar's speech in the convention show that he has pinched the government