आज चंद्रपुरात जे. पी. नड्डा यांची ‘विजय संकल्प’ जाहीर सभा
चंद्रपूर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला नेत्रदीपक यश मिळावे म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा देशातील लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. याची सुरुवात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून सोमवार, आज सोमवारी दुपारी 12 वाजता येथील विश्रामगृह समोरील न्यु इंग्लिश हायस्कूल ग्राऊंड येथे ‘विजय संकल्प’ जाहीर सभेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या जाहीर सभेला अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून जगत प्रकाश नड्डा, तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खा. रामदास तडस, आ. संजीव रेड्डी, आ. संदीप धुर्वे, आ. डॉ. रामदास आंबटकर, आ. बंटी भंगाडीया यांची उपस्थिती राहणार आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपाने 545 पैकी 282 जागा जिंकत परत एकदा वर्चस्व स्थापित केले. ही संख्या अजून वाढावी म्हणून व जेथे भाजपाचे खासदार नाही अशा लोकसभा मतदारसंघाचा जे. पी. नड्डा पहिल्या टप्प्यात प्रवास दौरा करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 144 मतदारसंघ असून, यात महाराष्ट्रातील 16 मतदारसंघाचा समावेश आहे. या प्रवास दौर्याची सुरवात चंद्रपुरातील विजय संकल्प जाहीर सभेने होणार आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींनी केले आहे.
BJP National President Jagat Prakash Nadda will visit the Lok Sabha constituencies of the country to ensure spectacular success for the BJP in the 2024 Lok Sabha elections. It will be started from Chandrapur-Vani-Arni Lok Sabha Constituency on Monday, this Monday at 12 noon at the New English High School ground in front of the Rest House here through a public meeting called 'Vijay Sankalp'.