तिहेरी हत्याकांड : पत्नीसह दोन मुलींना वडिलांने झोपेतच संपवीलं
Chandrapur Tak
चंद्रपूर : गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हातील नागभिड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावात घडली असून या घटनेने या जिल्हा हादरला आहे. अल्का तलमले (वय ४०), तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत.आरोपी अंबादास तलमले (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्याकांडाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मौशी गावातील अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होते. काही महिन्यापासून घरात कौटुंबिक कलह सुरू होता, अशी माहिती आहे. शिनिवारचा रात्री मुलगा बाहेर गेला होता. दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या. अंबादास तलमले याने कुऱ्हाडीने तिघांवर सपासप वार केलेत. यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. या तिहेरी हत्याकांड्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.