आई वडिलांना आदर्श मानून वाटचाल करा : प्रा. डॉ. विठ्ठल कांगणे
कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लढण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलाय.डॉ चेतन खुटेमाटे यांच्यासारख्या लोकांना विधिमंडळात पाठवणे गरजेचे, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल कांगणे यांनी केले.
"चला बदल घडवूया" या उपक्रमांतर्गत प्रेरणेतून प्रगती या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान भद्रावती येथील मारोतराव पिपराडे सभागृहात संपन्न झाले. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. विठ्ठल कांगणे यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. आई वडिलांना आदर्श मानून वाटचाल करा, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे होते, तर उद्घाटन प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट भूपेंद्र रायपुरे, डॉ. सचिन भेदे, डॉ. भाऊराव खुटेमाटे, योगेश मत्ते, प्रफुल चटकी, डॉ. कवडू खुटेमाटे, एन. एस. वाळवे, मांडवकर सर, डॉ. योगेश गेडाम, शहिस्ता पठाण, वणीता ताई घुमे, आशिष देहारकर, अशोक येरगुडे, पुरुषोत्तमजी मत्ते, रेखताई खुटेमाटे, डॉ. गिरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पिंगे, संतोष कुचनकर, विनोद थेरे, अनुप खुटेमाटे, संतोष भोयर, सचिन खुटेमाटे, अनुप पावडे, सौरभ पिदूरकर, संजय चिडे, निलेश खुटेमाटे, अनिल डोंगे, महेश आस्कर यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन संतोष कुचनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष भोयर यांनी व्यक्त केले.